इतर धर्मीयांनी वाचायलाच हवे आणि मुस्लिमांनी पारायण करायला हवे असे पुस्तक!
आजच्या काळातच नव्हे तर नेहमीच अशा पुस्तकाची गरज होती. केवळ इस्लामबद्दलचे गैरसमज दूर करायला नाही, तर इस्लाम समजून घ्यायला या पुस्तकाचा फार मोठा हातभार लागणार आहे. ज्यांनी या धर्माबद्दल बरीवाईट अशी काहीही मते तयार केलेली नाहीत, अशांनी हे पुस्तक वाचणे अत्यावश्यक आहे. या पुस्तकातील विचार समजून घेण्याअगोदर वाचकाला आकर्षित करते, ती लेखकाची मराठी भाषेवरील हुकूमत आणि त्याचा वापर.......